मुंबई  : सध्या बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे आमिर खान. मि. परफेक्शनिस्ट अशी बॉलीवूडमध्ये आमिर खानची ओळख आहे. आमिर खरतर लाईमलाईटपासून दूरच राहतो तसेच अॅवॉर्ड शोमध्येही तो जात नाही. जाणून घ्या यामागचे कारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 26 वर्षांपासून आमिर या इंडस्ट्रीत काम करतोय. आमिर लहानपणीच या क्षेत्रात आपले करियर सुरु केले. तो पहिल्यांदा आपल्या वडिलांची प्रॉडक्शन कंपनी यादों की बारातमध्ये दिसला होता. मुख्य अभिनेता म्हणून त्याने कयामत से कयामत या सिनेमातून सुरुवात केली. त्यावेळी ही फिल्म सुपरहिट ठरली. आमिरला या चित्रपटासाठी स्पेशल ज्युरी अॅवॉर्डही मिळाला होता. 


आमिरने कयामत ते कयामत तक यातून या क्षेत्रात धमाकेदार सुरुवात केली असली तरी त्यानंतर सलग त्याचे चित्रपट फ्लॉप ठरत गेले. काहींना वाटले आमिरची कारकिर्द संपली की काय? मात्र जो जीता वही सिकंदर या चित्रपटातून त्याने पुन्हा जोरदार कमबॅक केलं. राजा हिंदुस्तानी या चित्रपटाने त्याच्या जीवनाला वेगळेच वळण मिळाले त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेले नाही. 


राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला या चित्रपटालाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. या चित्रपटातील गाण्यांनी मोठी धूम माजवली. मात्र त्याचवेळी यशराज चोप्राच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमातील भूमिकेमुळए शाहरुखला बेस्ट अभिनेत्याच्या अॅवॉर्ड मिळाला. यामुळे नाराज झालेला आमिर खान फिल्मफेअर सोडून  निघून गेला. त्यानंतर आतापर्यंत आमिरने कोणत्याही अॅवॉर्डशोमध्ये भाग घेतलेला नाही.