मुंबई : अभिनेता, गायक हिमेश रेशमिया आणि त्याची पत्नी कोमल यांनी आपलं २२ वर्षांचं नातं तोडत घटस्फोटाचा निर्णय घेतलाय. या निर्णयासाठी टीव्ही अभिनेत्री सोनल कपूर हिच्याशी हिमेशचं अफेअर जबाबदार असल्याची चर्चा आहे. यावर अखेर हिमेशच्या पत्नीनं मौन सोडलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आमच्या घटस्फोटाला सोनिया जबाबदार नाही. ती एक फॅमिली फ्रेंड आहे. तिचं नाव यात आणणं योग्य नाही' असं कोमलनं म्हटलंय. 


हिमेशचं कुटुंब हे माझंच कुटुंब आहे आणि मी त्यांच्यावर खूप प्रेम करते, असंही कोमलनं म्हटलंय. 


हिमेशशी घटस्फोटाबद्दल विचारण्यात आल्यावर, एखाद्या नात्यात एकमेकांचा आदर असणं खूप गरजेचा असतो आणि याचसाठी आम्ही वेगळे होत आहोत. आमच्या कुटुंबियांनीही आमचा घटस्फोट स्वीकारलाय, असं कोमल यांनी म्हटलंय.