मुंबई :  'सैराट'मधील आर्ची आणि परशाला बोनस म्हणून १० लाख देणार किंवा ५ कोटी देणार अशी सोशल मीडियावर बोंबाबोंब होत आहेत ती पूर्णपणे निराधार आहे. या संदर्भात झी स्टुडिओतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अफवा आहेत. त्यावर चित्रपट रसिकांनी विश्वास ठेऊ नये असे सांगण्यात आले आहे. 


कलाकार आणि झी स्टुडिओतील करार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सैराट' चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि इतर तंत्रज्ञ यांच्यात आणि झी स्टुडिओत एक करार झाला आहे. हा करार काय झाला आहे हे दोघांच्या सहमतीने झाला आहे. त्यामुळे त्यांना यशानंतर बोनस दिला जाणार की नाही हे मीडियाला सांगितलं नाही किंवा सांगणं बंधनकारक नाही. असं काही करणार असतील तर ते झी स्टुडिओ पत्रकार परिषद घेऊन करतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 


काय होती अफवा


'सैराट'ने कोट्यवधी रुपये कमविल्यानंतर झी स्टुडिओने त्यांना बोनस म्हणून आर्ची (रिंकू राजगुरू) आणि परशा (आकाश ठोसर) यांना प्रत्येकी पाच कोटी देणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने छापले होते. पण ते छापताना न बोलले आकडे त्यात छापण्यात आले आणि अफवांना उधाण आले. 


झी स्टुडिओच्या हवाल्याने छापलेल्या बातमी रिपोर्टरने प्रश्न विचारला होता. यशानंतर कलाकारांना पैसे देणार का. त्यावर संबंधितांनी आम्ही यासंदर्भात विचार करत आहोत असे उत्तर दिले. कोणत्याही करारात किती पैसे देणार हे कलाकार किंवा कंपनी उघड करत नाही. मग संबंधित वृत्तपत्राने पाच कोटीचे आकडे स्वतःहून टाकल्याचे सूत्रांनी सांगितले. 


व्हॉट्सअॅपवरही अफवा 


आर्ची आणि परशाला  प्रत्येकी ४ लाख रुपये ठरविण्यात आले होते. पण चित्रपटाच्या यशानंतर त्यांना ११ कोटी देणार आहे. तसेच २ कोटी  'नाम' या संस्थेला देणार आहे.  वांगी गाव ग्रामपंचायतीला प्रत्येकी १० लाख रुपये देणार आहेत.