मुंबई : हॉलिवूड स्टार विन डीजल त्याच्या आगामी 'xXx : रिटर्न ऑफ जैंडर केज' सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आला आहे. गुरुवारी सकाळी एयरपोर्टवर त्यांचं जोरदार स्वागत झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


xXx: रिटर्न ऑफ जैंडर केज' 2002 मध्ये आलेल्या सिनेमाची ही तिसरी सिरीज आहे. 2005 मध्ये दुसरी सिरीज आली होती. सिनेमाच्या प्रचारासाठी दीपिका तिच्या वाढदिवशीही मॅक्सिकोमध्ये होती. त्यानंतर लंडनला ती तिच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेली होती. आता सिनेमातील स्टार आणि सिनेमाची टीम ही प्रमोशनसाठी भारतात आली आहे. 


हा सिनेमा सर्वात आधी भारतात प्रदर्शित होणार आहे. इतर देशांमध्ये तो 19 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. भारतात 14 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. विन डीजल दोन दिवस मुंबईमध्ये राहणार आहे. ते माध्यमांशीही संवाध साधणार आहे. दीपिका त्यांच्या स्वागतासाठी सज्ज दिसते आहे. ढोल नगाड्यांमध्ये दीपिका आणि विनचं स्वागत झालं. जोरदार स्वागताने परदेशी पाहुणे ही भारावले.