सेन्सॉरविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनुरागचं प्रेक्षकांना आर्जव
सेन्सॉरच्या मनमानी पद्धतीच्या कारभाराविरुद्ध आपला आवाज उंचावून कोर्टातून आपला हक्क अनुराग कश्यपनं मिळवलाच... पण, तरीही माशी शिंकलीच.
मुंबई : सेन्सॉरच्या मनमानी पद्धतीच्या कारभाराविरुद्ध आपला आवाज उंचावून कोर्टातून आपला हक्क अनुराग कश्यपनं मिळवलाच... पण, तरीही माशी शिंकलीच.
चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमाची 'सेन्सॉर' कडे दिलेली कॉपी लीक झाली. सेन्सॉर बोर्डाकडूनच हा चित्रपट लीक झाल्याच्या चर्चाही सुरु आहेत. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हा चित्रपट लीक करणाऱ्याची ओळख पटली आहे आणि या व्यक्तीला लवकरच अटक होऊ शकते, अशी माहितीही मिळतेय.
पण, याचा फटका सिनेमाला आणि सिनेमाशी निगडीत व्यक्तींना बसणार हे नक्की... यामुळेच अनुरागनं आपल्या प्रेक्षकांकडे एक आर्जव केलंय. यात तो म्हणतोय, 'की तुम्हाला टोरंटवरून सिनेमा डाऊनलोड करायचा असेल तर मी तुम्हाला थांबवू शकणार नाही... पण, शनिवारपर्यंत थांबा... स्वत: च्या हक्कासाठी लढणाऱ्या लोकांना दबवण्याचा हा प्रयत्न आहे'.