मुंबई : एकेकाळची पॉर्नस्टार आणि बॉलिवूडची अभिनेत्री अशी ओळख असलेली सनी लिओन हिच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर सनीनं आपल्या भूतकाळाला रामराम ठोकला... पण, आपल्या इथपर्यंतच्या प्रवासाचा सनीनं पस्तावा केला नाही. मोठ्या धीराने ती लोकांना सामोरी गेली... आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली. 


पण, हीच सनी लिओन लहानपणी मात्र एक निरागस आणि खूपच लाजाळू मुलगी होती... मग, तिचं एका 'पॉर्नस्टार'मध्ये कसं रुपांतर झालं? याचा उलगडा सनीच्या नव्या चित्रपटातून होणार आहे.


'तेरे बिन लादेन'चा दिग्दर्शक अभिषेक वर्मा हा सनीच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटात सनी आणि तिचा नवरा डेनियल हे दोघेही दिसणार आहेत.