मुंबई : हृतिक रोशनने लुकच्या बाबतीत बॉलिवूडच्या सर्व कलाकारांना मागे टाकलं आहे. तो जगातील टॉप- १० हँडसम पुरुषांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप-१० मध्ये सलमान खानला देखील सातवा क्रमांक मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘मिशन इम्पॉसिबल’ फेम हॉलिवूड स्टार टॉम क्रूज पहिल्या स्थानावर आहे. दूसऱ्या स्थानावर तैवानचा मॉडेल आणि अभिनेता गॉडफ्रेगाओ आहे. खास गोष्ट ही आहे की टॉप १ज मध्ये ६ अभिनेते हे ५० पेक्षा अधिक वयाचे आहेत.


या यादीत सर्वात कमी वयाचा अभिनेता इराकचा उमर बोरकान आहे जो सहाव्या स्थानावर आहे. त्याचं वय २७ वर्ष आहे.


सर्वात अधिक वय असलेला अमेरिकेचा डेंजल वाशिंग्टन पाचव्या स्थानावर आहे.


एका वेबसाईटने केलेल्या या हँडसम पुरुषांच्या यादीत ‘ट्विलाइट’ फेम रॉबर्ट पँटिंसन चौथ्या क्रमांवर आहे.


ब्रिटेनचा प्रिंस विलियम हा दहाव्या स्थानावर आहे.


1. टॉम क्रूज- हॉलिवूड अॅक्टर आणि प्रोड्यूसर. ५० च्या वयातही अनेक त्याच्या चाहत्या आहेत. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे.



2. गॉडफ्रेगाओ- लूक आणि ड्रेसिंग सेंससाठी जाणला जाणार अभिनेता. ३२ वय असून तो अजूनही अविवाहित आहे.


3. हृतिक रोशन - ४२ वर्षाचा एक चांगला कलाकार म्हणून ओळख. उंची आणि लूकसाठी अनेक चाहते आहेत.


4.रॉबर्ट पँटिंसन- ब्रिटेनचा अभिनेता पँटिंसन हा गाणे देखील कम्पोज करतो. अजूनही अविवाहित आहे.


5. डेंजल- अमेरिकन अॅक्टर आणि फिल्ममेकर म्हणून ओळख. ६२ वर्षाच्या असून अजूनही सुंदरता कायम आहे.


6.उमर बोरकान अल गाला- २७ वर्षाचा उमर मिडिल ईस्ट देशांमध्ये फेमस आहे. एक फॅनने त्याला कार देखील गिफ्ट केली आहे.


7. सलमान खान- सलमान ५० वयानंतरही अजून यंग आणि स्मार्ट दिसतो. त्याचे भारतात अनेक चाहेत आहेत.


8. नोह मिल्स- कॅनडाचा मॉडेल आणि हीरो. उंची, डोळे आणि केसांमुळे लोकप्रिय आहे.


9. ब्रॅड पिट- हॉलिवूडचा ५३ वर्षीय ब्रॅड एक चांगला अभिनेता म्हणून जाणला जातो. 


10. प्रिंस विलियम-  यूनाइटेड किंग्डमचा राजकुमार याला देखील या यादीत स्थान मिळालं आहे.