नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रानौत आणि ऋतिक रोशन यांच्यातील मतभेद आता विकोपाला गेल्याचं समजतंय... इतकंच नाही, तर या दोघांनी एकमेकांना कायदेशीर नोटिसा पाठवल्याचंही समजतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिड डे' या वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, कंगना आणि ऋतिकनं आपापल्या वकिलांच्या माध्यमातून एकमेकांना नोटीस पाठवल्यात. 


'...तर पत्र सार्वजनिक करणार'


कंगनानं एक प्रेस कॉन्फरन्स बोलावून आपली माफी मागावी. तसंच कंगनानं 'सिली एक्स' असा ऋतिकचा उल्लेख केला नव्हता असंही स्पष्ट करावं, अशी मागणी ऋतिकनं आपल्या नोटीशीत केलीय. असं न केल्यास, कंगनासोबत झालेला सगळा पत्रव्यवहार आपण सार्वजनिक करू, अशी धमकीही ऋतिकनं दिल्याचं समजतंय. 


कंगनानंही धाडली नोटीस


दुसरीकडे कंगनानंही आपले वकिल रिझवान यांच्या माध्यमातून ऋतिकला कायदेशीर नोटीस पाठवलीय. यामध्ये आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांनुसार, उकसवणं आणि धमकी देण्याचे आरोप करण्यात आलेत. 


'मग मी बोलेन...'


याविषयीच्या प्रश्नांना उत्तर देताना कंगनाच्या वकिलांनी 'मला या विषयावर बोलण्याचे निर्देश देण्यात आलेले नाहीत' असं म्हणत याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. पहिल्यांदा ऋतिककडून काही येऊ द्या, मग मी बोलेन असंही त्यांनी म्हटलंय. 


'आशिकी ३'मधून कंगनाला हटवून सोनम कपूरची एन्ट्री झाल्यानंतर हे प्रकरण अनेकदा सार्वजनिकरित्या समोर आलं होतं. कंगना आणि ऋतिकनं 'काईटस्' (२०१०) आणि 'कृष ३' (२०१३) मध्ये एकत्र काम केलंय.