मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच मराठीत बोलताना तुम्हाला दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हृदयांतर' या मराठी चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. शिवाय मनिष पॉलदेखील या सिनेमात पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत दिसेल. 


फॅशन डिझायनर म्हणून आपली ओळख बनवल्यानंतर विक्रम फडणीस आता 'हृदयांतर' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 



नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. शाहरुख खान आणि अर्जुन कपूर हेदेखील या औचित्यानं इथं उपस्थित झाले होते. एका दाम्पत्याची वैवाहिक जीवनातील झुंज हा या सिनेमाचा विषय... 


विक्रम फडणीस यांच्यासोबत झालेल्या अवघ्या 20 मिनिटांच्या मिटिंगमध्ये हृतिकनं मराठी चित्रपटात काम करण्यास होकार दिलाय. या सिनेमात हृतिक मराठीत बोलतानाही दिसणार आहे.