मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिला तिच्याच वडिलांचं चरित्र पूर्णपणे वाचण्याची हिंमत होत नसल्याचं वक्तव्य केलं आहे. नुकतंच भारती प्रधान यांनी लिहिलेल्या 'एनिथिंग बट खामोश - द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी' या शत्रुघ्न सिन्हा यांच्या चरित्राचं अनावरण करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी बोलताना सोनाक्षी म्हणाली 'मला पुस्तक वाचायची खूप भीती वाटतेय. आपल्या पालकांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडलेल्या असतात ज्या त्यांच्या मुलांना माहिती नसणंच योग्य असतं.'


या पुस्तकातील एका भागात शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री रीना रॉय यांच्यातील पडद्यामागील केमिस्ट्रीबद्दल चर्चा केली आहे. पूनम यांच्यासोबत झालेल्या लग्नानंतरही शत्रुघ्न यांचे रीनाशी त्यांचे कसे संबंध राहिले होते त्याचीही चर्चा यात आहे.


शत्रुघ्न अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास जिथपर्यंत आहे तेवढे पुस्तक तिने वाचले आहे. आपापल्या आयुष्यातील काही बाबींची घरात कधीच कोणी एकमेकांशी चर्चा करत नसतं. त्यामुळेच ती या पुस्तकातील पुढचा भाग वाचणार नाहीये. 


पत्नी पूनम यांनी मात्र आपण हे पुस्तक पूर्णपणे वाचले असल्याचे म्हटले आहे. 'पुस्तक वाचल्यावर या माणसाला आपण इतका काळ ओळखतच नव्हतो. खरं तर मला हे सर्व आधीपासून माहित असतं तर किती बरं झालं असतं,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.