मुंबई : ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता पॉप सिंगर जस्टिन बीबरने भारतात पहिलं कॉन्सर्ट बुधवारी मुंबईमध्ये केलं. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये परफॉर्म करतांना त्याला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. या शोसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनडाचा हा २३ वर्षीय गायक जस्टीन बीबरची जादू भारतातही पाहायला मिळाली. लाईव्ह परफॉर्मेंसचा आनंद त्याच्या चाहत्यांनी लूटला. 'द फीलिंग या गाण्याने त्य़ाने या शोची सुरुवात केली.


फोर्ब्‍स मॅग्‍जीननुसार २०१६ मझ्ये जस्टीन बीबरची कमाई ५.६ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास ३५८ कोटी होती. मॅग्‍जीनच्या अंडर ३० अंडर ३० यादीत त्याला स्थान मिळालं होतं. या यादीत यशस्वी उद्योजकांची नावे देखील आहेत.


२०१६ साठी फोर्ब्‍सने टॉप १०० सेलेब्रिटीची यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये जस्टीन बीबर हा २६ व्या स्थानावर होता. या लिस्‍टमध्ये टॉपवर सिंगर टेलर स्विफ्ट होता.