अमिताभ बच्चन यांना आयकर विभागाचे प्रश्न
पनामा पेपर लीक प्रकरणी आयकर विभागानं अमिताभ बच्चन यांना काही प्रश्न पाठवले आहेत.
मुंबई: पनामा पेपर लीक प्रकरणी आयकर विभागानं अमिताभ बच्चन यांना काही प्रश्न पाठवले आहेत. पनामा पेपरमध्ये आलेल्या रिपोर्टनंतर अमिताभ बच्चन यांनी केलेल्या गुंतवणुकीबाबतचे हे प्रश्न आहेत.
याआधी पनामामध्ये नाव आल्याबाबत आयकर विभागानं बिग बींना विचारणा केली होती. तेव्हा अमिताभ यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आता आयकर विभागानं हे नवे प्रश्न पाठवले आहेत. एका आठवड्यामध्ये या प्रश्नाची उत्तरं द्या असंही विभागानं सांगितलं आहे. आयकर विभागातल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
पनामा पेपरनं केलेला टॅक्सचोरीचा दावा अमिताभ बच्चन यांनी याआधीच फेटाळून लावला आहे. मला या कंपन्यांबाबत काहीच माहिती नाही, माझ्या नावाचा गैरवापर होत आहे, मी सगळे टॅक्स भरले आहेत, असं अमिताभ बच्चन म्हणाले होते.