कॅलिफोर्निया : भारतीय तबला वादक संदीप दास यांना यंदाच्या ग्रॅमी अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय. वर्ल्ड म्युझिक कॅटेगरीत संदीप दास यांना आज हा पुरस्कार देण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅलिफोर्नियात झालेल्या शानदार सोहळ्यात संदीप दास यांचा गौरव करण्यात आला. चीन आणि अमेरिकन संगीतकारांच्या सिंग मी होम  या अल्बममध्ये संदीप दास यांनी आपल्या तबल्याची कलेचा आविष्कार मांडलाय. 


यंदा बेस्ट क्लासिकल क्रोसओव्हरचा पुरस्कार या अल्बमला मिळालाय. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध सतार वादक अनुष्का शंकर यांच्या अल्बमलाही याच कॅटगरीत नामांकन मिळालं होते.  पण यंदा सहाव्यांदा अनु्ष्का शंकर यांना पुरस्कारानं हुलकावणी दिली.