आयपीएल नाही, तर नागिनला मिळतोय अधिक टीआरपी
आयपीएलचा यंदाचा हा सीझन खेळापेक्षा त्याच्या वादामुळेच अधिक गाजतोय.
मुंबई : आयपीएलचा यंदाचा हा सीझन खेळापेक्षा त्याच्या वादामुळेच अधिक गाजतोय.
राज्यातील दुष्काळामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्यावरुन बरेच वाद सुरु आहेत. या वादाचा फटका काही प्रमाणात आयपीएलला टीआरपीमध्ये होताना दिसतोय. आयपीएलच्या आधीच्या सीझनच्या तुलनेत यंदाच्या सीझनचा टीआरपी कमी झाल्याचे दिसून आलेय.
आयपीएलपेक्षा सध्या नागिन या मालिकेने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवलीये. टीआरपीमध्ये नागिन मालिका अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्टार प्लसवरील 'ये हे मोहब्बते' ही मालिका आहे.
या मालिकेत विमान हायजॅकच्या कथेतुन सात वर्ष लांब असलेल्या 'इशिता' आणि 'रमन' या मुख्य जोडीला एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर झी टिव्हीवरील 'कुमकुम भाग्य' ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
बार्क संस्थेने दिलेल्या रेटींगच्या आधारे ही आकडेवारी काढण्यात आली आहे. तसेच शनिवारपासून कपिल शर्माचा नवा शो सोनी चॅनेलवर सुरु झाला आहे. त्यामुळे आता या नव्या शोचा टीआरपीवर काय परिणाम होईल हे लवकरच पाहायला मिळेल.