आयपीएस म्हणतो, `ऐ दिल है मुश्किल`वर बहिष्कार टाका
गोवा पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी `ऐ दिल है मुश्किल` सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. कारण यात महान गायक मोहंमद रफी यांचा अपमान केल्याचा आरोप आहे.
पणजी : गोवा पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. कारण यात महान गायक मोहंमद रफी यांचा अपमान केल्याचा आरोप आहे.
चंदर चित्रपटाच्या एका दृश्यावर नाराज आहेत, त्यांनी रफी यांच्या गायनाची तुलना रडण्याशी केली आहे. सिनेमात अभिनेत्री अनुष्का शर्मा अभिनेता रणबीर कपूरला म्हणते, मोहंमद रफी? तेच ना ते गायचे कमी आणि रडायचे जास्त?
रफी यांच्या परिवारातील लोकांनी या संवादावर नाराजी आणि हरकत घेतली आहे. १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी चंदर यांनी म्हटलं आहे, जर तुम्ही रफी साहेबांचे फॅन असाल, तर या सिनेमावर बहिष्कार टाका, मोहंमद रफी हे भारतातील महान गायकांपैकी एक आहेत, यासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.