`नाना पाटेकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे होता`
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते अनेक कलाकारांना प्रदान करण्यात आले. ज्यामध्ये अनेक मराठी कलाकारांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते अनेक कलाकारांना प्रदान करण्यात आले. ज्यामध्ये अनेक मराठी कलाकारांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
बेस्ट अॅक्टरसाठी देखील दोन नावं स्पर्धेत होती. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि नटसम्राट नाना पाटेकर यांच्यात बेस्ट अॅक्टर पुरस्कारासाठी चुरस होती. ज्युरींना देखील नाना आणि अमिताभ यांच्यापैकी कोणाला पुरस्कार द्यावा यामध्ये बरीच चर्चा झालं असं रमेश सिपी यांनी पुरस्कार सोहळ्यात सांगतिलं होतं.
'नटसम्राट'साठी नाना पाटेकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे होता असं बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांने म्हटलं आहे. 'नटसम्राट'नेही बॉक्स-ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता.
अभिनेता इरफान खानने मराठी चित्रपट सैराटचं स्क्रिनिंग करतांना मराठी चित्रपटांचं कोतूक केलंय. नटसम्राट हा देखील एक उत्कृष्ट सिनेमा होता आणि त्यासाठी नानांना पुरस्कार दिला गेला पाहिजे होता असं इरफानने म्हटलंय.