...म्हणूनच झालं अरबाझ-मलाईकाचं पॅचअप!
कतरिना-रणबीरच्या ब्रेकअपनंतर बॉलिवूडला हादरवून टाकणारी बातमी आली ती अरबाझ खान आणि मलाईका अरोरा यांच्या ब्रेकअपची... पण, ही दोघंही नुकतीच हातात हात घालून पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर दिसली... आणि त्यांच्या सगळ्या फॅन्सनं सुस्कारा सोडला.
मुंबई : कतरिना-रणबीरच्या ब्रेकअपनंतर बॉलिवूडला हादरवून टाकणारी बातमी आली ती अरबाझ खान आणि मलाईका अरोरा यांच्या ब्रेकअपची... पण, ही दोघंही नुकतीच हातात हात घालून पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर दिसली... आणि त्यांच्या सगळ्या फॅन्सनं सुस्कारा सोडला.
कुणामुळे झालं अरबाझ-मलाईकाचं पॅचअप
बॉलिवूड दबंगसाठी सलमानसाठी आपलं कुटुंब सगळ्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचं आहे... हे तर एव्हाना त्याच्या फॅन्सना माहीत आहे. त्यामुळे, त्यानंच अरबाझ-मलाईकाच्या नात्यातील बिघडलेल्या गोष्टी सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय.
नुकताच, सलमान खान अरबाझ आणि मलाईकासोबत आणि तिच्या कुटुंबीयांसोबत जेवत करताना आढळला होता. त्यानंच अरबाझ-मलाईकाच्या पॅचअपमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली, असा दावा एका वेबसाईटनं केलाय.
यानंतर, मलाईकाच्या कुटुंबीयांनी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेन्टलाही भेट दिली होती.
'मलाईकाला गमावू शकत नाही'
जगात कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मी मलाईकावर प्रेम करतो... तिला गमावण्याची मला भीती वाटते, असं म्हणत प्रांजळपणे आपल्या पत्नीवर असलेल्या प्रेमाची कबुली अरबाझनं दिली होती. त्यामुळेच आपल्या भावावर प्रेम करणाऱ्या सलमाननं या दोघांत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, असं म्हटलं जातं.