मुंबई : १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तने गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुटकेनंतर २३ वर्षानंतर मला स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटतेय. मी माझ्या स्वातंत्र्यासाठी २३ वर्षे लढलो, असे संजय म्हणाला. यावेळी वडिलांच्या आठवणीने तो थोडा भावुकही झाला. 


यावेळी वडील हवे होते. त्यांना मी आता मिस करतोय, असे संजयने यावेळी सांगितले. आता सुटका झाल्यानंतर पॅरोलवर बाहेर आल्यासारखे वाटतेय. सुटका झाल्यानंतरच्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे कळत नाहीये, असेही संजय दत्त म्हणाला.


यादरम्यान, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर धरतीला स्पर्श केला तसेच तिरंग्याला सलाम करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर उत्तर देताना, भारतभूमूीवर माझे प्रेम आहे. तो तिरंगा माझे जीवन आहे. मी या देशाचा नागरिक आहे आणि भारतीय असल्याच मला अभिमान आहे असे म्हणाला.