सलमान या अभिनेत्रीपासून दूर राहा, लूलियाने दिली ताकीद
सलमान खानची गर्लफ्रेंड लूलिया वंतूरला सलमान आणि त्याच्या मैत्रीणी यांच्यातला क्लोजपणा खटकतोय. अनेक दिवसांपासून सलमान आणि लूलिया वंतूर यांच्यातील संबंधाच्या चर्चो रंगतायत. त्यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे.
मुंबई : सलमान खानची गर्लफ्रेंड लूलिया वंतूरला सलमान आणि त्याच्या मैत्रीणी यांच्यातला क्लोजपणा खटकतोय. अनेक दिवसांपासून सलमान आणि लूलिया वंतूर यांच्यातील संबंधाच्या चर्चो रंगतायत. त्यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे.
लूलियाने सलमान ताकीद दिली आहे की त्याने जय हो सिनेमातील को-स्टार डेजी शाह हिच्यापासून दूर रहावं. डेजी शाह सलमानच्या खास मैत्रींणीमधली एक आहे. डेजीने बोल्ड सिनेमा 'हेट स्टोरी 3' मध्ये काम केल्यानंतर म्हटलं होतं की तिने हा सिनेमा सलमानच्या सल्ल्यानंतरच केला.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सलमानने लूलियाच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर तिने परिवारातील एका ज्येष्ठ सदस्यासोबत याबाबत सांगितलं आणि त्यांनी यामध्ये लक्ष घातलं.
आता सलमान लूलियाच्या या गोष्टीकडे पुन्हा दुर्लक्ष करेल की डेजी शाह सोबत असलेली मैत्री तोडेल याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे.