मुंबई : गॉसिप्स आणि आंबट चर्चा यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असलेल्या 'कॉफी विथ करन' या कार्यक्रमाच्या पाचव्या सीझनमध्ये पुढच्या भागात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जग्गू दादाची आपल्या मुलासोबतची बॉन्डिंग या भागात पाहायला मिळणार आहे. एकाच काऊचवर शेजारी शेजारी टायगर आणि जॅकी बसलेले असतील तर काय काय ऐकायला मिळू शकतं... याचा अंदाजा कदाचित हा टिझर पाहुन तुम्हाला येऊ शकेल. 


या भागात जॅकीचं 'माधुरी प्रेम'ही दिसतंय. दुसरीकडे टायगरला त्याच्या कॉलेज अफेअरबद्दल विचारलं असता, त्यानं आपण कधीही सीरियस रिलेशनशीपमध्ये पडलो नाही... फक्त क्रश... असं उत्तर दिलं... एव्हढंच नाही तर अभिनेत्री श्रद्धा कपूरवरचं प्रेमही त्यानं आपल्या वडिलांसमोर उघडपणे व्यक्त केलंय.