मुंबई : रवी जाधव निर्मीत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, इंद्रनिल सेनगुप्ता, शिवानी अशी कलाकारांची भली मोठी फौज असलेला प्रकाश कुंटे दिग्दर्शित '& जरा हटके' या सिनेमाची गोष्ट सिनेमाच्या नावाप्रमाणेच जरा हटके आहे.


सिनेमाची कथा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गोष्ट आहे मीरा, आकाश, निशांत आणि आस्था या चार व्यक्तिरेखांची.. मीरा आणि आकाश या दोन व्यक्तिरेखांचे एकमेकांवर भरपूर प्रेम आहे पण कधी ते व्यक्त करु शकले नाही. मीरा मनाविरुद्ध एका दुस-याच मुलाशी लग्न करते तर आकाशचंही लग्न जमतं. जवळपास वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर मीरा आणि आकाशची पुन्ह भेट होते. पण या वेळी सगळे काही बदलेलं असतं. मीराला १७ वर्षांची मुलगी आहे तर आकाशला ही कॉजेलात जाणारा मुलगा आहे. हे दोघं पुन्हा एकमोकांच्या प्रेमात पडतात, आणि लग्न करायचं ठरवतात. हे सगळं यांच्या मुलांना कळल्यानंतर ते दोघं यांचं नातं स्वीकारतात का? त्यानंतर काय घडतं? अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे.


कॉफीनंतर जरा हटके


दिग्दर्शक प्रकाश कुंटे ज्यांनी या आधी कॉफी आणि बरंच काही हा सिनेमा केला होता इन शॉर्ट एक सिंपल लव्ह स्टोरी  खुपच युनिक पद्धतीनं बिग स्र्किनवर मांडली होती. या सिनेमातही प्रकाश कुंटे यांनी एक जरा हटके फॅमिली ड्रामा खुपच साध्या आणि इफेक्टिव्हरित्या रुपेरी पडद्यावर रंगवला आहे. सिनेमाची कथा मिताली जोशी यांनी लिहिली असून आजच्या प्रेक्षकांना काहीतरी नक्कीच आउट ओफ द बॉक्स देण्याचा प्रयत्न केलाय.


कलाकारांचा अभिनय


अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, इंद्रनिल सेनगुप्ता, शिवानी आणि सिद्धार्थ मेनन या तिघानीही आपआपल्या व्यक्तिरेखा चोख पार पाडल्या आहेत. सिनेमाची सिनेमाटोग्राफी कमाल झालीये. कथा चांगली आहे, पण पटकथेत काहीतरी मिसिंग वाटतं. 


किती स्टार्स


'&जरा हटके' हा एक फॅमिली एंटरटेनर आहे या सिनेमाला मी देतेय ३ स्टार्स.