मुंबई : छोट्या पडद्यावरील 'जय मल्हार' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत या मालिकेतील टीमची निरोप पार्टी झाली. यावेळी बानू फेम ईशा केसकर हीने एक घोषणा करुन टाकली, लवकरच नव्या भूमिकेत तुमच्या भेटीला येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश कोठारे निर्मित 'जय मल्हार' या मालिकेतील कलाकार देवदत्त नागे (मल्हार), ईशा केसकर (बानू) आणि सुरभी हांडे (म्हाळसा) हे घराघरांमध्ये पोहोचले. त्यापैकी ईशाशी मारलेल्या या गप्पा.


भांडण आणि भाईगिरी...


ईशाने आपले काम करतानाचे काही अनुभव शेअर केलेत. ती सांगते, या लोकप्रिय मालिकेमुळे माझ्यावर अधिकची जबाबदारी वाढली आहे. चारचौघांत बसून आता मला भांडण करता येणार नाही. भाईगिरी करु शकणार नाही, अशी बंधने या मालिकेमुळे आलीत. आता मी मुक्त आहे. मात्र, मी तेच करेन असंही ती सांगायला विसरलेली नाही. अधिकच्या जबाबदारीमुळे माझ्यावर बंधणे कायम राहितील, पण मी मुक्त आहे.


मी चारवेळा ऑडीशन दिली. घरच्यांनी सांगितले की, ही शेवटची ऑडीशन असेल. त्यावेळी मी सिलेक्ट झाली आणि ही मालिका मिळाली. ही मालिका करताना खूप वेगळा अनुभव आला. 'झी'ने आम्हाला संभाळून घेतले. शिस्त काय असते ते पाहायला मिळाले. महेश कोठारे यांच्यासोबत काम करण्याचा वेगळा अनुभव मिळाला. हा अनुभव आयुष्यात खूप मोलाचा ठरणार आहे. सकाळी ८ वाजता फोन यायचा तयारी झाली का? येथूनच कामाला सुरुवात व्हायची.


प्रेक्षकांचे खूप प्रेम


प्रत्येक कलाकाराला सुरुवातीच्या काळात खूप काही शिकायला मिळते तसेच मलाही शिकायला मिळाले.  ‘जय मल्हार’ या मालिकेने मला एक वेगळी ओळख दिली आहे. घराघरात मला लोकप्रिय केलेय. प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. ते प्रेम कमी होणार असे मी म्हणणार नाही. पण या मालिकेच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात होतो. तो संपर्क आता तुटणार आहे. याचे खूप वाईट वाटत आहे. 


भूमिका पार पाडताना खूप मजा आली. मोठा अनुभव मिळाला. देवाच्या भूमिकेत काम करणे खूप कठीण होते. पण खूप आनंद घेता आला. वेशभूषा आणि आभूषणं अंगावर असण्याचे कौतुक वाटायचं.



ईशा - सुरभी मैत्री


ईशा आणि सुरभी या दोघी फार वेगळ्या होत्या. सुरुवातीच्या काळात या दोघी एकमेकींसोबत बोलतच नव्हत्या. तीन वर्षांत सुरुवातीला कोणीही एकमेकींचे नाव घेतले नव्हते. दोन वर्षानंतर दोघींची चांगली मैत्री झाली. ही मैत्री पुढे कायम पाहायला मिळेल, अशी खट्ट मैत्री झालेय. एक दिवस भेटणार नाही, असं यापुढे कधीही होणार नाही, एतकी घट्ट ही मैत्री झालेय, असे ईशा अभिमानाने सांगते.