बेंबळे माढा :  'सैराट' चित्रपटात 'लंगड्या'ची भूमिका साकारणारा माढा तालुक्यातील बेंबळे गावातील अभिनेता तानाजी गळगुंडे याला रोजगारासाठी अपंग कोट्यातून ५० हजार रुपये किमतीचे झेरॉक्स मशीन देणार असल्याची घोषणा पंचायत समितीचे उपसभापती तुकाराम ढवळे यांनी केली.


काय मिळाला रोजगार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही झेरोक्स मशीन येत्या सहा जून रोजी पंचायत समितीतील कार्यक्रमात देण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले. बेंबळे ग्रामस्थांच्या वतीने आयो‍जित तानाजीच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. तानाजी हा सध्या टेंभुर्णी येथील महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षात शिकत आहे.


संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या पायाने अपंग असलेल्या आणि चित्रपटात "लंगड्या बाळ्या' या नावाने परिचित असलेला तानाजी गळगुंडे हा कलाकार मूळचा बेंबळे (ता.माढा) चा आहे.


सैराटमुळे मिळाली प्रसिद्धी


सैराट चित्रपटात परश्याचा मित्राची भूमिका करून त्याला साथ देऊन चित्रपटात हास्यकल्लोळ घडवून आणलेल्या "बाळ्या, लंगड्या उर्फ प्रदीप'ची चर्चा राज्यात सुसाट सुरू आहे.
शरीराने अपंग असलेली व्यक्ती घरात बसून राहता 'अपंगत्व' असले तरी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलेच्या माध्यमातून करिअर करता येते, हा संदेश तानाजीने समाजाला घालून दिला आहे. तानाजी सध्या टेंभुर्णी येथील महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.


गावात जल्लोष


सैराटचित्रपटात उत्कृष्ट अभिनय करून रूपेरी पडद्यावर झळकलेल्या तानाजीने बेंबळे गावात प्रवेश करताच त्याच्या मित्र, ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल ताशा हलग्या वाजवत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली.