मुंबई : १९९७ मध्ये सुपरहिट ठरलेला सिनेमा जुडवा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान आणि करिश्मा कपूर त्या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत होते. जुडवा २ सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुण धवन हा वडील डेविड धवन आणि प्रोड्यूसर साजिद नाडियाडवाला यांच्या या क्लासिक कॉमिडी सिनेमाचा रिमेक करणार आहे. ज्यामध्ये वरुण डबल रोलमध्ये आहे. वरुणने तापसी आणि जॅकलीनला टॅग करत त्याच्या या सिनेमाचा पहिला लूक शेअर केला आहे. 'एक्सक्लूसिव जुडवा 2, सप्टेंबर २९, फर्स्ट लूक, राजा आणि प्रेम, तुम्ही कोणाला निवडणार ? असं या फोटोसोबत वरुणने ट्विट केलं आहे.


फर्स्ट लुकमध्ये वरुण राजा आणि प्रेम दोन्ही भूमिकेत दिसत आहे. या सिनेमात जॅकलीन आणि तापसी यांची देखील भूमिका असणार आहे. सलमान खान आणि करिश्मा कपूर यांचा या सिनेमात स्पेशल अॅपीयरेंस असणार आहे. वरुणचा नवा अवतार आणि सलमान-करिश्माचा कॅमियो रोल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सूकता पाहायला मिळणार आहे.