लॉस एंजिलिस : दिग्दर्शक जेए बयोना यांनी आपला चित्रपट 'ज्युरासिक वर्ल्ड २' चा फर्स्ट लुक एका फोटोच्या माध्यामातून जाहीर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी हा फोटो ट्विट केला असून त्यात एक मोठं संग्रहालस दिसतंय. आसपासचा भाग पाहता पुन्हा पहिल्या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.


 


लोकांच्या मनात चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता असून लवकरच चित्रपटाचं प्रमोशन सुरु होणारे.


चित्रपट 'ज्युरासिक वर्ल्ड'चा हा दुसरा भाग आहे. याही चित्रपटात क्रिस प्रॅट आणि ब्राईस डलास हॉवर्ड आपल्या भूमिकेत पुन्हा दिसून येतील.


हा चित्रपट पुढच्या वर्षी २२ जूनला जगभरातील सिनेमाघरांत प्रदर्शित होईल.