मुंबई : आंतरराष्ट्रीय पॉप स्टार जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टची त्याच्या फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ दिसून आली. 10 मे रोजी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या कॉन्सर्टसाठी जवळपास 50 हजार लोक दाखल झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कॉन्सर्टचं सगळ्यात महागडं तिकीट 76 हजार रुपयांना विकलं गेलं होतं. या क्रेझजा बराच फायदा महाराष्ट्र सरकारलाही झालाय. या कार्यक्रमातून महाराष्ट्रानं तब्बल 3.8 करोड रुपये एन्टरटेन्मेंट टॅक्स मिळालाय. 


या कार्यक्रमासाठी बीबरच्या टीमनं कार्यक्रमाच्या स्पॉन्सर्ससमोर एक मोठ्ठीच्या मोठ्ठी लिस्टही ठेवली होती. यामध्ये दोन फाईव्ह स्टार हॉटेल बुकिंग, रोल्स रॉयस कार आणि टीमसाठी 10 सेडान कार तसंच 2 व्होल्वो बसचीही मागणी करण्यात आली होती. 


या कार्यक्रमादरम्यान आपण कुणालाही ऑटोग्राफ देणार नसल्याचंही बीबरनं अगोदरच स्पष्ट केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, बीबरसोबत त्याचे कुटुंबीय आणि टीमचे जवळपास 120 लोक भारतात आले होते.