मुंबई : झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका का रे दुरावा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एक आगळीवेगळी कथा असल्याने या मालिकेला लोकांनी चांगली पसंती दर्शवली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होणार सून मी मधील श्री-जान्हवी या कपलनंतर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेलेल कपल म्हणजे जय आणि आदिती. गेल्या सव्वा वर्षापासून ही मालिका सुरु आहे. मात्र आता या मालिकेचा शेवट कसा होणार आहे याबाबत प्रेक्षकांच्या मनात मोठी उत्सुकता निर्माण झालीये. 


या मालिकेच्या जागी २८ मार्चपासून 'काहे दिया परदेस' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मराठी आणि हिंदी संस्कृती एकत्रितपणे या मालिकेतून दिसणार आहे. 


लग्न झालेले असतानाही ऑफिसमध्ये लग्न लपवताना जय आणि आदितीची होणारी तारेवरची कसरत, त्यादरम्यान निर्माण होणाऱ्या समस्या, मात्र यातही त्या दोघांचा एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम कायम असते. या वेगळ्या कथानकामुळेच प्रेक्षकांना ही मालिका आपलीशी वाटली होती.  सुयश टिळक आणि सुरुची अडारकर या कलाकारांव्यतिरिक्त मालिकेतील इतर कलाकारांच्या भूमिकाही गाजल्या.