मुंबई : सिनेमाच्या इतिहासात अभिनेता रजनीकांतच्या 'कबाली'ने प्रदर्शनापूर्वीच धूम माजवली आहे. 'कबाली' या सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यू-ट्युबवर गाणी, ट्रेलरला चांगल्या हिट्स मिळत आहे. सकाळी ६.०० वाजता प्रदर्शित होणारा हा पहिलाच सिनेमा ठरलाय. हा शो हाऊस फुल्ल झाला. एक आठवडा आधिच सिनेमाची तिकीटेही विकली गेलीत. तर दक्षिणकडे काही कंपन्यांनी चक्क सुट्टी जाहीर केली तर काहींनी कर्मचाऱ्यांना तिकीटे काढून दिलीत.


रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कबाली’ला मुंबईतील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. माटुंग्यातील अरोरा टॉकीजमध्ये या चित्रपटाच्या सकाळी सहा वाजता झालेल्या पहिल्या शोला इतिहासात पहिल्यांदाच हाऊस फुल्ल गर्दी होती.  


या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?


- ६५ वर्षीय रजनिकांतचा हा १५९ वा सिनेमा.  
 
- थिएटर्समध्ये  पहाटे पाच वाजता प्रदर्शित झालेला 'कबाली' हा देशातील पहिला सिनेमा.
 
-  'कबाली' या सिनेमाच्या निमित्ताने दक्षिणेकडील राज्यातील अनेक शहरात सुट्टी जाहीर.  
 
-  'कबाली' एकाच दिवशी भारत, चीन, अमेरिका येथे प्रदर्शित करण्यात आला. चीनमध्ये ४५०,  अमेरिकेत ४००, तर मलेशिया, जपान आणि इंडोनेशियामध्ये मिळून ३०० स्क्रीन्सवर झळकला


-  'कबाली' हा सिनेमा फ्रान्समधील ली ग्रँड रेक्स या जगातल्या सर्वात मोठ्या चित्रपटगृहात प्रदर्शित. पहिला भारतीय चित्रपट



- प्रमोशनसाठी एक अनोखा फंडा वापरण्यात आला होता. एअर एशियाच्या विमानावर पोस्टर लावून चित्रपटाचे प्रमोशन. तसेच चाहत्यांना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहता यावा, यासाठी एअर एशियाने विशेष विमानसफारीचं आयोजन. खास विमान बंगळुरुतून उड्डाण घेऊन चेन्नईला उतरले. 


- या विमानाचं तिकीट ७,८६० रुपये होते. यामध्ये विमान तिकिटाशिवाय कबाली सिनेमाचं तिकीट, ऑडिओ सीडी, नाश्ता, जेवण, स्नॅक्स यांचा समावेश 
 
-  'कबाली' हा सिनेमा प्रदर्शनापूर्वी ऑनलाईन लीक झाला असला तरी त्याचा चित्रपटाच्या व्यवसायावर काहीही परिणाम झालेला नाही.
 
-  'कबाली' या सिनेमाच्या निर्मितीसाठी १६० कोटी रुपये खर्च . प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमाने २०० कोटींची कमाई केली. प्रदर्शनापूर्वी निर्मितीचे पैसे वसूल करणारा हा पहिला सिनेमा.
 
- दाक्षिणात्य सिनेमे उत्तर भारतात व्यवसाय करत नाही असे अनेक वर्षांपासूनच गणित. मात्र,  १००० स्क्रिनवर प्रदर्शित होणारा हा पहिला दाक्षिणात्य सिनेमा


-  'कबाली' या सिनेमाच्या ट्रेलरला एका आठवड्यात अडीच कोटी हिट्स


- कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार असला की त्या चित्रपटातले कलाकार मोठ्या प्रमाणावर चित्रपटाचे प्रमोशन करतात. पण रजनीकांत यांनी प्रमोशन केले नाही. ते अमेरिकेत आपल्या गुरुंना भेटायला गेले.