चेन्नई : सुपरस्टार रजनीकांतचा 'कबाली' हा सिनेमा सध्या प्रेक्षकांनी ओसंडून वाहतोय. भल्या पहाटेचे शोजसाठीही हाऊसफुल्लचे बोर्ड झळकलेत... यामुळे तुम्हाला तिकीट मिळालं नसेल आणि या सिनेमाची तिकीट ब्लॅकनं मिळवण्याचा तुम्हीही प्रयत्न करताय... तर थांबा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण, रजनीसाठी क्रेझी फॅन्सनं एकच गर्दी केल्यानं अगोदरच नियोजित शोजची सगळी तिकीट फुल्लं आहेत... त्यामुळेच ब्लॅकच्या तिकीटांचा भाव आपोआपच वधारलाय. सध्या, 'कबाली'चं एक तिकीट पाच हजार रुपयांना ब्लॅकमध्ये विकलं जातंय. 


रजनी चॉकलेट हिरो नाही. त्याच्याकडं सिक्स पॅक एब नाहीत, चिकना गुळगुळीत गोरा चेहराही नाही. डोक्याला टक्कल, एरवी साधा झब्बा आणि पायजमा अशी अगदी साधी राहणी... हिरो मटेरियल म्हणावं असं त्यांच्यात काहीच नाही... मात्र तरीही रजनीची जादू अशी आहे की चाहत्यांनी त्याला थेट देवाच्या देव्हा-यात नेऊन बसवलंय.