मुंबई : अभिनेता सलमान खानच्या सुल्तान चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम केले आहेत. सुल्ताननंतर सलमान आता ट्यूबलाईट या चित्रपटामध्ये दिसणार आहे. कबीर खान या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कबीर खाननंच या आगामी चित्रपटाच्या लोकेशनचा फोटो शेअर केला आहे. लडाख येथे या चित्रपटाच्या शूटिंगला 28 तारखेपासून सुरुवात होणार आहे. जवळपास महिनाभर या चित्रपटाचं शूटिंग लडाखमध्ये होणार आहे.  


भारत आणि चीनमध्ये झालेल्या युद्धावर या चित्रपट आहे. एक सामान्य माणूस आणि लहान चीनी मुलगी यांच्यावर हा चित्रपट असणार आहे. सलमान आणि कबीरचा हा तिसरा चित्रपट असणार आहे.