प्रत्यूषाच्या आत्महत्येनंतर आता विविध वादांना सुरुवात
मुंबई : बालिका वधू फेम प्रत्यूषा बॅनर्जीच्या मृत्यूचं गूढ उकलक नसताना आता नवा वाद सुरू झाला आहे.
मुंबई : बालिका वधू फेम प्रत्यूषा बॅनर्जीच्या मृत्यूचं गूढ उकलक नसताना आता नवा वाद सुरू झाला आहे. अभिनेत्री आणि खासदार यांनी एक ट्वीट करत आत्महत्या करणं म्हणजे मूर्खपणा आहे असं म्हटलं आहे. 'आत्महत्या केल्याने फक्त माध्यमांना बातम्या मिळतात. संकटांवर मात करुन जिंकणाऱ्यांची जग कदर करतं. प्रत्येकाने आयुष्यातील संकटांचा सामना करुन त्यावर विजय मिळवावा,' अशा आशयाची ट्वीट्स त्यांनी केली होती.
या त्यांच्या ट्विट्सवर मोठा वादंग उठला. त्यांच्यावर काही जणांनी टीका केली, तर काहींनी त्यांची पाठराखण केली. प्रत्यूषाची मैत्रीण काम्या पंजाबीने त्यांच्या या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली आहे. 'कोण आहे ही अशा प्रकारे बोलणारी? त्यांची कोणती मैत्रीण कधी पंख्याला लटकलीये? जर लटकली असेल तर बोलावे. कोणाविषयी काहीही बोलणं सोपं असतं,' अशी टीका काम्याने केली आहे.
मंगळवारी राखी सावंतनेही एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशात छताचे पंख्यांवर बंदी घालण्याची अजब मागणी केली होती. प्रत्यूषाच्या आत्महत्येच्या गूढानंतर आता मात्र नवनवे वाद सुरू झाले आहेत.