मुंबई: अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रनावत यांच्यामधला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ऋतिकनं माझे फोटो आणि ईमेल मीडियाला जाणूनबुजून दिले,  माझी अब्रुनुकसानी झाली आहे, त्यामुळे ऋतिकला अटक करा अशी मागणी कंगनानं मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी या मागणीचं पत्र मुंबई पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांना लिहीलं आहे. 


दरम्यान कंगनानं ऋतिकला त्यानं पाठवलेली कायदेशीर नोटीस मागे घ्यायचाही सल्ला दिला आहे. ही नोटीस मागे घेतली नाही तर कायदेशीर कारवाईला तयार राहा असं कंगनाच्या वकिलांनी ऋतिकला सांगितलं आहे. 


एका मुलाखतीमध्ये ऋतिक सिली एक्स असल्याचं म्हणलं होतं, यामुळे भडकलेल्या ऋतिकनं कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागायला सांगितली होती.