मुंबई : आपल्या कामासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रानौत हिला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. यावर तिची 'फॅशन' सिनेमातील सह-अभिनेत्री प्रियांका चोपडा हिने प्रतिक्रिया दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकानं कंगनाचं तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन केलंय. कंगनाला 'तनु वेडस् मनु रिटर्न्स' या सिनेमात दुहेरी भूमिका निभावल्याबद्दल सर्वश्रेष्ठ अभनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यानंतर प्रियांकानं ट्विटरवरून कंगनाला शुभेच्छा दिल्यात. 



'कंगना या विजयाबद्दल खरं म्हणजे तूच हकदार आहेस. तू निसंदेह एक शक्ती स्रोत आहेस... तुला खूप खूप प्रेम' असं प्रियांकानं आपल्या ट्विटरवर म्हटलंय. प्रियांका सध्या बेवॉचच्या परदेशात सुरू असलेल्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.