मुंबई : कंगना एक जबरदस्त अदाकारा आहे यामध्ये कुठलाच संशय नाही. पण सध्या कंगनाची वागणूक सगळ्यांनाच खटकू लागली आहे. त्यामुळेच आता कंगनाच्या हातून सिनेमे जाऊ लागले आहेत. रंगूनची मिस जुलिया आता तनूच्या भूमिकेत दिसणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाच्या नखऱ्यांना कंटाळून 'तनू वेड्स मनू थ्री'मधून निर्मात्यांनी कंगनाला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. तनू वेड्स मनू थ्रीचं दिग्दर्शन हिमांशू शर्मा करणार आहे. हिमांशूने पहिल्या दोन भागांची कथा लिहीली होती. हिमांशूच्या सांगण्यावरुनचं तिस-या भागातून कंगनाचा पत्ता कट केल्याची चर्चा सध्या बीटाऊनमध्ये रंगते आहे.


कारण तनू वेड्स मनू रिटर्न्सच्या शूट दरम्यान कंगनाच्या नख-यांनी सगळ्यांच्याच नाके नऊ आणले होते. आता पार्टथ्री साठी नव्या हिरोईनचा शोध सुरु आहे..पार्ट ३ची लवकरचं औपचारिक घोषणा होणार असून कंगनाची जागा कोणती अभिनेत्री घेते हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.