मुंबई : कन्नड सैराट 'मनसू मल्लीगे'चा ऑफिशियल प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. मराठी सैराटपेक्षा कन्नड सैराट मनसू मल्लीगेचा प्रोमो जरा हटके आहे. कन्नड मनसू मल्लीगेमध्ये चित्रपटाची कहाणी समजण्यास वाव आहे, तसा वाव मराठी सैराटमध्ये नव्हता, या चित्रपटात गायक सोनू निगमने देखील एक गाणं गायलं आहे, तर मराठी प्रमाणे श्रेया घोषालनेही मनसू मल्लीगेत गाणं म्हटलंय, तर पाहा कसा आहे कन्नड सैराट मनसू मल्लीगेचा प्रोमो...