मुंबई : द कपिल शर्मा शोविषयी खूप दिवसांनी एक चांगली बातमी आहे. एवढ्या मोठ्या भांडणानंतरही कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोवर एकत्रच काम करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या काही एपिसोडमध्ये ते दोघं पुन्हा चाहत्यांना हसवताना दिसतील. इतकंच नाही तर अली असगर आणि चंदन प्रभाकरही या शोमध्ये असतील. 


वाचक मित्रांनो त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी आपल्याला पुन्हा एकदा मिळतेय. भविष्यात ते दोघं एकत्र काम करतील की नाही माहीत नाही पण तोपर्यंत तरी त्यांना एका स्टेजवरून काम करताना पाहून घेऊयात.


कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोवर यांच्यातील कथित वादावर पडदा कधी पडतोय, याचा विचार त्यांचे चाहते करताहेत. इतकंच नाही तर हे दोघं सर्वांना एप्रिल फुल करण्याच प्रयत्न करताहेत, असाही 'सकारात्मक' विचार काहींच्या मनात येतोय.