मुंबई : बॉलिवूड अॅक्टर आणि छोट्या पडद्यावरील एका मोठ्या शोचा अँकर प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा एका गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. कपिलची प्रसिद्धी पाहता त्याच्या अनेक मुली फॅन आहेत. काहींनी तर जाहीरपणे कपिलशी लग्नाची ही इच्छा बोलून दाखवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल शर्मा आता सिंगल राहिलेला नाही. तो एका तरुणीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. प्रीती सिमोस या तरुणीला कपिल डेट करतोय. प्रीती कॉमेडी नाइट्स विथ कपिल शोची क्रिएटिव डायरेक्टर होती. कपिलच्या यशामागे या प्रीतीचाही हात असल्याचं म्हटलं जातंय.


प्रीती सिमोस टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. कपिल शर्मा आणि प्रीती सिमोस हे एकमेकांच्या खूप जवळ आहेत. कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या आधी कॉमेडी सर्कस शोमध्ये कपिल आणइ प्रीतीची भेट झाली होती. म्हटलं जातं की, या शो दरम्यानच दोघांमध्ये मैत्री झाली. जेव्हा कपिल आणि कलर्स चॅनलमध्ये वाद झाला तेव्हा प्रीतीने कपिलची बाजू घेतली होती.


कपिल आणि प्रीती या दोघांनी यावर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कपिलला जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा आम्ही फक्त चांगलं फ्रेंड्स असल्याचं कपिलने म्हटलं आणि बोलणं टाळलं.