मुंबई : देशातला एक प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून नावारुपाला आलेला कपिल शर्मा कोणाच्या प्रेमात पडलाय याबाबत अनेकांना जाणून घ्यायची उत्सूकता असेल. अनेक तरुणी आज कपिल शर्माच्या चाहत्या आहेत. अभिनेत्याप्रमाणेच कपिलचे फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात आहेत. पण कपिल शर्माने सगळ्यांन समोर प्रेम जाहीर केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल शर्माने ट्विटर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो गिन्नी चतरथ सोबत दिसत आहे. गिन्नी कपिलसोबत 'हंस बलिये' शोमध्ये दिसली होती. गिन्नीचं खरे नाव भवनीत चत्रार्थ आहे. ती जालंधरची राहणारी आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार गिन्नी कपिलची कॉलेज फ्रेंड आहे. कपिलने ट्विटरवर म्हटलं आहे की, 'मी तिला माझी अर्धांगी तर नाही म्हणणार पण ती मला पूर्ण करते. लव यू गिन्नी. मी हिच्यावर खूप प्रेम करतो' असं कपिलने ट्विट केलं आहे.