मुंबई : महाराष्ट्रभर प्रेक्षकांना याडं लावणाऱा 'सैराट' चित्रपटाची टीम कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी या भागाचं शूटिंग पूर्ण झाला. यावेळी कलाकारांनी खूपच धमाल केली. कपिल शर्मानेही या एपिसोडला मोठा रिस्पॉन्स मिळाल्याचे ट्विटरवरुन सांगितले. तसेच या प्रतिसादाबद्दल त्याने आभारही मानले. 


सैराटच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमाची टीम हिंदी शोमध्ये पाहायला मिळणार आहे. यापूर्वी मराठीतील चला हवा येऊ द्यामध्ये हिंदी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी शाहरुख खान, जॉन अब्राहम, नीरजा या बॉलीवूड कलाकारांनी उपस्थिती लावली होती.


मात्र कपिल शर्माच्या हिंदी शोमध्ये प्रथमच मराठी चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावरुन मराठी सिनेमा अपग्रेड होत असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली. या एपिसोडसाठी आर्ची अर्थात रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, बाळ्या म्हणजेच तानाजी गळगुंडे, सल्या अर्थात अरबाज शेख यावेळी उपस्थित होते.