कॉमेडी किंग कपिल शर्मासाठी धोक्याची घंटा
कॉमेडी किंग म्हणून ओळख असलेल्या कपिल शर्माच्या नव्या शोबाबत धोक्याची घंटा वाजत आहे. `द कपिल शर्मा शो`चा सुरुवातीचे २ एपिसोड्सचे टीआरपी 3 आणि 2.9 होती. टीआरपीचा हा आंकडा त्याच्या पहिल्या शोच्या तुलनेत खूपच कमी आहे.
मुंबई : कॉमेडी किंग म्हणून ओळख असलेल्या कपिल शर्माच्या नव्या शोबाबत धोक्याची घंटा वाजत आहे. 'द कपिल शर्मा शो'चा सुरुवातीचे २ एपिसोड्सचे टीआरपी 3 आणि 2.9 होती. टीआरपीचा हा आंकडा त्याच्या पहिल्या शोच्या तुलनेत खूपच कमी आहे.
कपिल शर्मा शोचा टीआरपी घसरला
३० एप्रिल ते ६ मे दरम्यान त्याचा कॉम्पेटीटर कृष्णाचा कॉमेडी नाइट्स लाइवचा टीआरपी हा फक्त ०.२ टक्क्यांनी कमी होता. कपिल शर्माच्या शोचा टीआरपी 1.9 होता तर कृष्णाच्या शोची 1.7 होती. त्यामुळे कपिल शर्मासमोर आता त्याच्या नव्या शोचा टीआरपी वाढवण्याचं मोठं आव्हान असणार आहे.