मुंबई : विमानातील गैरवर्तणुकीप्रकरणी एअर इंडियाने शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातलेली असतानाच आता कॉमेडियन कपिल शर्मावरही बंदी घालण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीच सुनील ग्रोव्हरशी भांडणामुळे कपिल शोबाबत चिंतेत आहे. त्यातच आता एअर इंडियानेही बंदी घातल्यास त्याच्या अडचणीत अधिकच भर पडेल. विमानात प्रवासादरम्यान सुनील ग्रोव्हर आणि कपिल यांच्यात भांडण झाले होते. 


त्यांच्या या भांडणामुळे विमानातील इतर प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला होता. कपिलच्या या गैरवर्तणुकीमुळे एअर इंडियाकडून कपिलवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे.