मुंबई: कपील शर्मानं आपल्या नव्या शोमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे. टीआरपीमध्ये कपीलच्या या नव्या शोनं अनेक लोकप्रिय कार्यक्रमांना मागे टाकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण अभिनेता शेखर सुमननं मात्र कपीलचा नवा शो फ्लॉप झाल्याचं म्हंटलं आहे. कपीलच्या या कॉमेडी शोनं निराशा केल्याचं शेखर सुमन म्हणाला आहे. शेखर सुमननं कपीलच्या या शोची तुलना अनुराग कश्यपचा फ्लॉप झालेला चित्रपट बॉम्बे वेलवेटशी केली आहे. 


बॉम्बे वेलवेट चित्रपटासारखीच कपीलच्या या शोचीही चर्चा झाली, पण दोघांची कामगिरी निराशाजनक झाली. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काही वेगळं करायला जाता, पण तिथेही तुम्हाला जुन्याच गोष्टी दिसल्या तर प्रेक्षक जुन्याच गोष्टी का करत आहात, असा प्रश्न विचारतात असं शेखर सुमन म्हणाला आहे. 


द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमधून कपीलनं छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. शेखर सुमन या शोचा जज होता.