मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्मानं आपल्या नव्या शो बद्दलचं मौन सोडलं आहे. गणपतीचा आशिर्वाद आम्हाला आहे. लवकरच एक चांगला शो घेऊन येत आहे, प्रेक्षकांनाही हा शो आवडेल अशी अपेक्षा आहे, असं कपिल शर्मा म्हणाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिलचा हा नवा शो 'सोनी'वर प्रसारित होणार आहे. कपिलसोबत या शोमध्ये सुनील ग्रोवर, कीकू शारदा, अली असगर, सुमोना चक्रवर्ती आणि चंदन प्रभाकर दिसतील. हे सगळे कलाकार कपिलसोबत कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्येही होते.


कपिलचा कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो प्रचंड लोकप्रिय झाला होता. या शो मुळे कपिल स्टार झाला. पण कलर्स चॅनलबरोबर झालेल्या वादामुळे हा शो बंद झाला. आता कलर्सवर कॉमेडी नाईट्स लाईव्ह हा कार्यक्रम कृष्णा अभिषेक होस्ट करत आहे.