मुंबई : 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमातून 'कपिलची पत्नी' म्हणून घराघरांत पोहचलेली सुमोना चक्रवर्ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, सुमोना लवकरच तिचा बॉयफ्रेंड सम्राट मुखर्जी याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. 


सम्राट आणि सुमोना गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत... आपलं नातं पुढे नेण्यासाठी त्यांनी आता विवाहाचा निर्णय घेतला. 


सम्राट मुखर्जी हा अभिनेत्री काजोल हिचा चुलत भाऊ आहे... तो सुमानाहून ११ वर्षांनी मोठा आहे. 


सम्राट यानं आशुतोष गोवारीकर यांचा सिनेमा 'खेलें हम जी जान से' या चित्रपटात दिसला होता. तसंच बंगाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये हा ओळखीचा चेहरा आहे.