मुंबई: आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या कपूर अँड सन्सनं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत 100 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. तर फक्त भारतामध्ये या चित्रपटानं 50 कोटी रुपये कमावले आहेत. 


2016 मध्ये बॉलीवूडच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी कपूर अँड सन्स ठरला आहे. आलिया आणि सिद्धार्थबरोबरच या चित्रपटामध्ये ऋषी कपूर आणि फवाद खान यांनीही काम केलं आहे. 18 मार्चला हा चित्रपट रिलीज झाला होता.