मुंबई : अभिनेत्री काजोल आपल्या बबली स्वाभावामुळे कायमच चर्चेत राहिलीय. करियरच्या अगदी सुरुवातीपासूनच बॉलिवूडमधले टॉप अॅक्टर्स आणि दिग्दर्शकांबरोबर तिची मैत्री राहिली आहे. मात्र, पती अजय देवगनसाठी काजोलनं काही खास मित्र सोडल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगताना दिसतेय.


...आणि मैत्री ठेचाळली!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय देवगनचा 'शिवाय' आणि फिल्ममेकर करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्किल' या दोन्ही सिनेमांची येत्या दिवाळीत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. मात्र करण आणि अजय दोघांपैकी कोणीच आपल्या सिनेमाबद्दल इनसिक्युअर नाहीय. एव्हढंच नाही तर अजयने विवादात सापडलेल्या करण जोहरच्या सिनेमाला सपोर्टही केलाय. 


भारतात पाकिस्तानी कलाकारांना बॅन करण्याच्या मुद्दयावर अजयने आपले मत मांडलंय. जे सिनेमे तयार आहेत त्यांना विरोध करणे चुकीचे असल्याचं अजय देवगनने म्हटलंय. 'मिस्टर कूल' अजय देवगन आणि करण जोहर यांच्यामधील खाजगी नातं मात्र काही फारसं उल्लेखनीय नाही. ज्याचा खुलासा नुकताच अजयने एका कार्यक्रमा दरम्यान केलाय.  


कारणं प्रोफेशनल...


'माझी करणबरोबर मैत्री नाहीय. काजोल आणि त्याच्या नात्यांमध्येही आता आधीसारखं बॉन्डिंग राहिलेलं नाही. हे सगळं पर्सनल कारणांमुळे झालं. प्रोफेशनल लाईफशी याचा काही संबंध नाही' असं अजयनं म्हटलंय. 


मात्र, अजयने या नात्यांमध्ये आलेल्या कटुतेचं कारण मात्र सांगितलेलं नाही. एकेकाळी करण जोहरच्या सिनेमांमध्ये त्याचा 'लकी गर्ल' असलेली काजोल एक तर 'मेनलीड'मध्ये राहायची नाहीतर 'स्पेशल अपिअरन्स' तरी करायची... बॉलिवूडमध्ये पण यांची मैत्री एक आदर्श होती. मात्र बदलत्या काळानुसार या दोघांमधील मैत्रीही संपुष्टात येऊ लागली. अजयनंही करण आणि काजोलचं नातं आता आधीसारखं राहिलं नसल्याची ग्वाही दिलीय.