मुंबई : ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या सिनेमाला प्रदर्शित करण्यास विरोध केला आहे. मुकेश भट्ट यांच्या नेतृत्वात आज काही जणांना मुंबई पोलिसांची भेट घेतली. त्यांनी म्हटलं की, मुंबई पोलिसांना त्यांना विश्वास दिला आहे की, त्यांना पूर्ण सुरक्षा पुरवली जाईल. आता कोणताही भीती नाही आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पोलीस त्यांच्यासोबत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी पुढे म्हटलं की, आपला देश एक स्वतंत्र देश आहे. ज्यांना सिनेमा पाहायचा आहे त्यांनी पाहावा, ज्यांना नाही पाहायचा त्यांनी नाही पाहावा. सिनेमागृहाचे मालक काय म्हणतात त्यांना म्हणून द्या त्याने काही फरक नाही पडत.


ऐ दिल है मुश्किल या सिनेमाच्या प्रदर्शित होण्यावर वाद होऊ शकतो. मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे की, प्रत्येक सिनेमागृहांना सुरक्षा देण्यासाठी मुंबई पोलीस तयार आहे. ही मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे. मुंबईतील प्रत्येक सिनेमागृहांना सुरक्षा पुरवण्यात येईल. कायदा-सुव्यवस्था मुंबई पोलीस बिघडू देणार नाही. असं देखील मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.