`तर आमचा घटस्फोट होईल`
`का अँड की` या चित्रपटामध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या किसिंग सीनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
मुंबई: 'का अँड की' या चित्रपटामध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या किसिंग सीनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तिला पुन्हा एकदा या किसिंग सिनचं रिक्रिएशन करायला सांगण्यात आलं. पण याला तिनं स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. मी अर्जुनला ऑफ स्क्रिन किस केलं तर माझा घटस्फोटच होईल, असं करीना म्हणाली.
लग्नानंतर ऑन स्क्रीन किसिंग सीन न देण्याचं करिना आणि सैफचं कमिटमेंट झालं होतं. पण का अँड की या चित्रपटामध्ये करिनानं आपलं हे कमिटमेंट तोडलं आणि अर्जुनला किस केलं, ज्याचे पोस्टर सध्या व्हायरल झाले आहेत.