करिश्माला दुसऱ्यासोबत पाहून एक्स पतीचा सुटला तोल
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटावर कोर्टाने शिक्कामोर्तब केले, आता दोघे आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतंत्र आहेत.
मुंबई : करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटावर कोर्टाने शिक्कामोर्तब केले, आता दोघे आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतंत्र आहेत.
संजय कपूरचे नाव पहिली पत्नी प्रिया सचदेव हिच्याशी नाव जोडले जात आहे. पण संजयला करिश्मासोबत कोणी फरत असल्याचं रुचत नाही आहे. काही दिवसांपूर्वी लंडनच्या एका रेस्टॉरंटमध्ये करिश्मा आपल्या मित्रासोबत डिनर करतत होती. योगायोगाने संजय कपूरही या ठिकाणी होता. संजय हे पाहून कावराबावरा झाला. त्याचा तोल सुटला.
संजय खूप नाराज झाल्या त्याने काहीही पाहिले नाही आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. हे पाहून करिश्मा चकीत झाली. तिला समजले नाही की नाते संपले तरी हा नाराज का झाला आहे.
करिश्माच्या मित्राने या प्रकरणाला अत्यंत शांतपणे हाताळते. त्याने संजयला समजावले की तो आता तिचा पती नाही. त्यामुळे असे वागू नको. त्यामुळे तुझी आणि करिश्माची बदनामी होऊ शकते.
करिश्माच्या या मित्राचे नाव संदीप तोष्नीवाल आहे. करिश्मा त्याला अनेक वर्षापासून ओळखते आणि तो तिचा खास दोस्त आहे. अनेक जणांचे म्हणणे आहे खूप जवळचे संबंध आहे.