मुंबई : एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या डेली सोपमध्ये चिमुकल्या स्नेहाची भूमिका साकारणारी श्रिया आता २० वर्षांची झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रिया शर्मा असं या मुलीचं नाव... एकेकाळी चाईल्ड आर्टिस्ट म्हणून झळकलेली श्रिया आता दाक्षिणात्य सिनेमांत रोमान्स करताना पाहायला मिळते.



टीव्ही कार्यक्रमांशिवाय श्रियानं हिंदी, तेलुगू आणि तमिळ सिनेमांमध्येही काम केलंय. 


तीन वर्षांची असताना श्रियानं कॅमेऱ्यासमोर एन्ट्री घेतली होती. आता या इंडस्ट्रीत श्रियानं १६ वर्ष पूर्ण केलेत. 


श्रिया गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'निर्णला कॉन्वेन्ट' या सिनेमात दिसली होती. 


श्रियाला आत्तापर्यंत अनेक अॅवॉर्डस मिळालेत. २००४ मध्ये श्रियाला एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या कार्यक्रमासाठी 'फेव्हरेट छोटा बच्चा' म्हणूनही अॅवॉर्ड मिळाला होता.